उल्हास नगर नंतर आता मुंबईच्या मानखूर्द येथील बालगृहातील 18 मुलांना कोरोनाचा संसर्ग

मुंबईच्या (Mumbai) मानखूर्द (Mankhurd) येथील बालगृहातील (Children Home) 18 मुलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर बालगृहात एकच खळबळ माजली आहे. कोरोनाबाधित मुलांना वाशीनाका येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. या लहान मुलांच्या आरोग्याची देखरेख केली जात आहे.

कोरोनाच्या तिसरी येत्या सप्टेंबर आक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक बाधा होईल, असाही अंदाज तज्ज्ञांनी लावला आहे. यामुळे राज्य सरकार, महानगरपालिका, वैद्यकीय प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पण, मुंबई कोरोना हळूहळू हातापाय पसरत असल्याचे समोर येत आहे.

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उल्हानगर महापालिकेकडून शनिवारी (28 ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये 14 मुले कोरोना बाधित आढळली आहे. यातच मुंबईच्या (Mumbai) मानखूर्द (Mankhurd) येथील बालगृहातील (Children Home) 18 मुलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मानखूर्द येथील 18 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण पाहायला मिळत आहे.