
नुकतंच आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. परंतु आजही आम्ही एकत्र आहोत आणि आमचं नातं थोडं बदलंलय असे स्पष्टीकरण आमीर खानने दिले आहे. तसेच आमच्या चाहत्यांनी फार वाईट वाटून घेऊ नका आमच्यासाठी प्रार्थना करा असे आमिर म्हणाला.
पाणी फाऊंडेशनच्या ऑनलाईन कार्यक्रमात आमिर म्हणाला की, काल आम्ही आमच्या घटस्फोटाची घोषणा केली. त्यामुळे आमच्या चाहत्यांना थोडे दुःख झाले आहे. परंतु आजही आम्ही एकत्र आहोत. आमचं नातं थोडं बदलंलय. पानी फाऊंडेशन हे आमचे अपत्य आहे, त्यासाठी आम्ही एकत्र काम करत राहू आमच्या चाहत्यांनी फार वाईट वाटून घेऊ नये आमच्यासाठी प्रार्थना करा असे आवाहना आमीरने केले आहे.











