
सोलापूर – जगातील सर्वोत्तम शिक्षक महाराष्ट्राचे सुपुत्र रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
तब्बल ७ कोटी रुपयांचे बक्षिस युनेस्को व वार्की फाउंडेशन यांच्यावतीने जाहीर झाले आहे.
जि.प शाळा परितेवाडी जि.सोलापूर यांना जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मान आज जाहीर झाला झाल्याने भारतामधील अशी कामगिरी करणारे पहिलेच शिक्षक ठरले आहेत.
याआधी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. QR कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या त्यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.
ग्लोबल टीचर पुरस्कारातून मिळालेली रक्कम ही शिक्षण क्षेत्रातल्या नवकल्पनांना (innovation) वाव देण्यासाठी वापरली जाईल, असं डिसले यांनी सांगितलं.
सरकारी शाळा अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्था यांच्यात समन्वय पाहिजे असं त्यांना वाटतं. तसं झालं तर सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणखी वाढेल. सरकारने शिक्षण क्षेत्रातल्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे, असंही ते आवर्जून सांगत होते.
रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले आहेत. त्यांचं शालेय शिक्षण बार्शीमधल्याच सुलाखे विद्यालयामध्ये झालं. ते 2009 पासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. गेल्या 11 वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत.










