दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णयराज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले.

दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जाण्याचे प्रकार वारंवार घडतात.

याची दखल घेऊन राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीपासून प्रथमच प्रात्यक्षिकांचे गुण ‘ओएमआर’ गुणपत्रिकांऐवजी ऑनलाईन भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहे, बनावट गुणास आळा बसणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

दहावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा १० ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होईल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना www.mahahssboard.in या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत