रेडमी नोट ७ प्रोचा २७ मार्चला सेल

शाओमीचा रेडमी नोट ७ प्रो चा सेल नुकताच २० मार्च रोजी झाला होता. आता पुढचा सेल २७ मार्च रोजी होणार आहे. या सेलमध्ये आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. २७ मार्च रोजी होणारा सेल फ्लिपकार्ट आणि Mi.com या साइटवर दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. रेडमी नोट ७ प्रो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एअरटेलकडून ११२० जीबी पर्यंत ४ जी डेटा देण्यात येणार आहे. हा डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना आपला एअरटेल नंबर रिचार्ज करावा लागेल. एअरटेल या ऑफरवर काही निवडक प्रीपेड पॅक्स देत आहे. रेडमी नोट ७ प्रो ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबीच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ६४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये इतकी आहे.