फिनलंड मधील शालेय शिक्षण व्यवस्था

फिनलंडमध्ये मूल 7 वर्षांचे झाल्यावर त्याची शाळा सुरू होते. फिनलंडची शिक्षणपध्दती जगात सर्वोत्तम मानली जाते. शाळेचा तास ६० मिनिटांचा असतो त्यात ४५ मिनिटे शिकवणे व पंधरा मिनिटे छोटी सुट्टी अथवा ब्रेक.

शाळा सोमवार ते गुरुवार दिवसाचे ८ तास, शुक्रवार दुपारी १वाजे पर्यंत आणि शनिवारी सुट्टी. फिनलंडमध्ये शालेय शिक्षण पूर्णपणे मोफत आहे.पालक कोणत्याही गोष्टीसाठी एक पैसाही देत ​​नाहीत.हे सर्व शिक्षण सरकारी खर्चाने आहे.

प्रत्येक मुलाला सरकार कडून मोफत टॅबलेट मिळतो आणि सर्व पाठ्यपुस्तके टॅबलेटवर लोड केलेली असतात जेणेकरून मुलांची दप्तरापासून सुटका होते. शालेय भोजन मोफत असते. ते वैविध्यपूर्ण आणि स्वच्छ असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हवे तेवढे मिळू शकते.

देशाच्या शिक्षणातील प्रत्येक गुंतवणूक ही त्याच्या भविष्यातील गुंतवणूक असते. ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. सुशिक्षित राष्ट्र हे अर्थव्यवस्था, आरोग्य शिक्षण आणि न्याय या सर्वांचा गाडा ओढते.जर भारतात अशी शिक्षण व्यवस्था हवी असेल तर “…. जागृत नागरिक म्हणून परिवर्तन पर्व सुरू केले पाहिजे.