
नवी दिल्लीः पॅरा ऑलिम्पिकमधील पहिल्यांदा भारताला पदक मिळवून देणारी महिला अॅथलिट दीपा मलिक आणि आशियाई गेम्स तसेच कॉमनवेल्थ खेळात सुवर्ण पदक पटकावणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया या दोघांना प्रतिष्ठेचा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर क्रिेकेटपटू रवींद्र जाडेजाला ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आज दुपारी पुरस्कार समितीने याची घोषणा केली.
याबरोबरच द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी या विविध पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानंतर ते सर्व पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.











