अखेर युतीचं ठरलं: भाजपाकडून शिवसेनेला 126 जागांची ऑफर

मुंबई: विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाकडून युतीचा फॉर्म्युला ठरला असून, शिवसेनेला 126 जागांची ऑफर देण्यात आली आहे. शिवसेनेकडूनही होकार मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येणार आहे असे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची भेट होणार असून त्या भेटीत युतीची घोषणा करण्यात येणार आहे.