
महावितरण मेगा भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मार्फत महाराष्ट्र राज्यासाठी ‘विद्युत सहाय्यक’ पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महावीतरणाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयात सरळ सेवा भरती प्रक्रिया द्वारे सदर पदे सुरुवातीला तीन वर्षांच्या निश्चित कालावधी करीता व तद्नंतर ‘तंत्रज्ञन’ या नियमित पदावर नेमणूक करण्यात येणार आहे.
एकूण पाच हजार पदे असून बारावी उत्तीर्ण व इलेक्टरेसिण (वायरमन) कोर्स केलेला असावा. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असून याबाबतची अधिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज दिनांक13.7.2019 ते 26.7.2019 या कालावधीत करता येणार आहे.






