चालू घडामोडी
नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यादा देशाच्या पंतप्रधानपदी; जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न, महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण सात मंत्रीपद.
नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नरेंद्र दामोदरदास मोदी देशाच्या पंतप्रधानपदी सलग दुसर्यानंदा विराजमान झाले आहेत. मोदी - 2 सरकारचे हे मंत्रिमंडळ जम्बो असणार आहे हे स्पष्ट झाले. आज एकूण 58 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्यम्हणजे समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले असल्याचे दिसते. मोदी मंत्रिमंडळात सहा महिला मंत्री, घटकपक्षांचे चार...
मुंबई: स्मृती इराणी आणि एकता कपूर दोघीही तब्बल १४ किमी पायी चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या. दर्शन घेतल्यानंतर या दोघींनी सेल्फी काढला आणि एकतानं हाच सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत भाजपच्या उमेदवार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी 'जायंट किलर' ठरल्या. हा विजय साजरा करण्यासाठी स्मृती इराणी मुंबईतील...
मुंबई : आजच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाचा बारावीचा निकाल हा 90.25 टक्के लागला आहे. या वर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे दिसत आहे. सर्वाधिक निकाल हा कोकणातील असून 93.23 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूरचा असून तो 81.51 टक्के इतका लागला आहे.
सैराट फेम आर्चीनेदेखील...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharshtraeducation.com
बोर्डाने...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असण्याची शक्यता आहे.
महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेण्यासाठी असलेली अर्ज प्रक्रिया आजपासून (27 मे) सुरू झाली आहे.
कला, वाणिज्य,विज्ञान या शाखांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असणार आहे. अकरावीला प्रवेश घेण्यासाठी अर्जाचे दोन भाग भरावे लागतात....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शालेय जीवनापासून त्यांनी २०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेईपर्यंतचा कालखंड यात आहे. शाळेत जाण्याआधी रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा, इतरांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या आपल्या आईला घरी भांडी धुवू न देणारा, चहा विकता विकता मोठ्यांची 'नेहरूऐवजी सरदार पटेल पंतप्रधान असते तर चीनकडून पराभव झाला नसता' आदी 'चाय पे चर्चा' ऐकणारा, पुढे मोठा झाल्यावर सैनिक बनून देशासाठी...
थायरॉईड म्हणजे कायआपल्या गळ्याच्या समोरील भागात एक ग्रंथी असते त्याला थायरॉईड म्हणतात. या ग्रंथीमार्फत हार्मोन्स तयार केले जातात. हे थायरॉईड हार्मोन्स शरीरातील हृदयाचे ठोके, चयापचय, तापमान या गोष्टी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.थायरॉईडच्या या ग्रंथीमधून जर हार्मोन्सचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर यामुळे थायरॉईडसंबंधीचे डिसॉर्डर होण्याची शक्यता आहे जसं की, हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड. वजन वाढणं, थकवा येणं,गोष्टी...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे संसदीय सभागृहातील संविधानासमोर नतमस्तक झाले. भारताच्या लोकशाहीला आपल्याला समजून घ्यावे लागेल. भारतातील मतदारांना तुम्ही कोणत्याही मापदंडात मोजू शकत नाही. सत्तेच्या मानसिकतेचा मतदार स्वीकार करत नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
संसदीय नेतेपदी निवड...
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी एका खाजगी वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच नारायण राणे यांना काँग्रेसकडून ही ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी राणे यांनी स्वतंत्रपणेच लढणे पसंत केले.
गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांनी काढलेल्या फोटोतून आज जगातल्या सर्वांत उंच ठिकाणीसुद्धा अशी स्थिती नाही, हे दिसून येईल. एव्हरेस्ट शिखराजवळचा परिसर लोकांनी गजबजून गेलेला तुम्हाला दिसून येईल.
एव्हरेस्टजवळ या हंगामात 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मल यांच्या फोटोंनी सर्व जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या फोटोंमुळे जगातील सर्वोच्च शिखराच्या जवळ...











