आजपासून रंगणार मोहालीत कसोटी सामना, किंग कोहलीची 100वी कसोटी

4 मार्च रोजी विराट कोहली त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना चाहत्यांमध्ये खेळणार आहे. हा प्रसंग खास बनवल्याबद्दल टीम इंडियाचे अनेक खेळाडू आणि माजी खेळाडू किंग कोहलीचे अभिनंदन करत आहेत. मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरपासून ते माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली किंग कोहलीला शुभेच्छा देत आहेत. विराट कोहलीसाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मानेही हा क्षण खास बनवल्याची चर्चा आहे.

टीम इंडिया मोहाली (IND VS SL) मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळण्यास सुरुवात करताच, विराट कोहलीसाठी (Virat Kohli 100th Test) हा अविस्मरणीय सामना असेल. विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील 100वी कसोटी मोहालीच्या PCA स्टेडियमवर खेळणार आहे (भारत विरुद्ध श्रीलंका, पहिली कसोटी). याआधी रोहित शर्मा यांने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित म्हणाल विराट 100 टेस्ट खेळत आहे आणि आम्हाला त्याच्यासाठी हा प्रंसग खास बनवायचा आहे.