माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर Shane Warne याचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर Shane Warne याचा वयाच्या 52 व्या वर्षी संशयित हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती फॉक्स स्पोर्ट्कडून देण्यात आली आहे.

महान लेगस्पिनर शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्नच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक रॉड मार्श यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजलीचे शेन वॉर्नने ट्विट केले होते.