Common Wealth Games: T20 भारतीय महिला क्रिकेटचा, पाकिस्तानवर आठ विकेट्सनी विजय

कॉमन वेल्थ गेम्स 2022 स्पर्धेत बर्मिंगहॅम येथे झालेल्या T 20 महीला क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. भारतीय महिलांनी 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून “अ” गटात बार्बाडोस ला मागे सारून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध गमावला होता, त्यामुळे भारताला आजचा सामना सरस धावगतीने सामना जिकणे अनिवार्य होते. पाकिस्तान टीम सुध्दा त्यांचा पहिला सामना बार्बाडोस विरुद्ध गमावला होता. विजेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्हीं संघाना जिंकण अनिवार्य होते.

पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय पाकिस्तान महिला क्रिकेट टीमच्या चांगलाच अंगलट आला. कारण पाकिस्तानची टीम अवघ्या 99 धावात तंबूत परतली.

भारताने दोन विकेट्स गमावून विजयासाठी अवश्य असणारे १०० धावा स्मृती मंधना हिच्या तेज तर्रार अर्ध शतकाच्या जोरावर पुर्ण केल्या आणि आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. पुढील सामना भारताचा बार्बाडोस विरुद्ध होणार असून तो सामना जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याचे मार्ग मोकळा होणार आहे.