प्रगती फाउंडेशन आयोजित प्रोजेक्ट “हसी एक अनोखी मुस्कान”, ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाशी नवी मुंबई या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

नवी मुंबई : प्रगती फाउंडेशन आयोजित प्रोजेक्ट “हसी एक अनोखी मुस्कान” हा कार्यक्रम फेब्रुवारी २०२३ ते एप्रिल २०२३ या कालावधी मध्ये गिरिजाघर वेलफेअर असोसिएशन वृध्दाश्रम, खारघर, नवी मुंबई या वृद्धाश्रमात पार पाडण्यात आला. याच ठिकाणी लहान मुलांचे अनाथ आश्रम सुद्धा आहे.
संस्थेचा “साथ” हा मुळ कार्यक्राअंतर्गत “हसी एक अनोखी मुसकान” उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचा मुळ उद्देश वृध्द आश्रमातील ज्येष्ठांना विरंगुळा व करमणुक करण्याचा एक क्षण मिळावा तसेच अनाथ आश्रमातील मुलांना त्यांची बौद्धिक क्षमता व विचार करण्याची क्षमता विकसित करणे हा आहे .

कार्यक्रमाचे आयोजन प्रगती फाउंडेशन या संस्थे मार्फत श्री हरिहरपुत्रा भजन समाज यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाशी नवी मुंबई या महाविद्यालयाच्या मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

डॉ किरण राणे (अध्यक्ष, प्रगती फाउंडेशन), श्री राकेश वाणी, सौ सिध्दी राणे (प्रगती फाउंडेशन), श्री वसंत कुंजर (गिरीजाघर वेल्फेअर असोसिएशन ) व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात आला.

ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाशी नवी मुंबई मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या विद्यार्थ्यानी विविध मनोरंजनात्मक खेळ सादर केले.

मॅनेजमेंटचे धडे गिरवत असताना एक जबाबदार नागरीक म्हणून सामाजिक कर्तव्याचे पालन करणे अपेक्षित आहे आणि म्हणूनच या सामाजिक दायित्व कर्तव्य पार पाडत असताना विद्यार्थ्यांना विविध मॅनेजमेंट संकल्पना प्रत्यक्षात शिकता यावे हा उद्देश्य होता.

ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाचे संचालक डॉ आर जी रत्नावत व विद्यार्थ्यांचे प्रॉजेक्ट मार्गदर्शक (गाईड) डॉ मौमिता रॉय (प्रोग्राम हेड, एम एम एस), डॉ राघवेंद्र बेंडिगेरी (फॅकल्टी एम एम एस), डॉ अमी नगर (फॅकल्टी एम एम एस), आणि प्रो स्वाती घोष (प्लेसमेंट हेड एम एम एस) यांनी विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन दीले.

या सामाजिक उपक्रमात महाविद्यालयाचे एम एम एस चे विद्यार्थी साहिल शिंदे, गौरव गुलाठी, अभिषेक मंडल, जसिक बेकम, स्नेहल चौघुले, गरिमा सिंग, साहिल कांबळे, अक्षत ओझा, तन्वी खेडेकर, अभिषेक घरडे, उद्देशा परते, पुजा अनबलगन, श्रेयसी शिवाळे, मित बराय, आणि रित्विजा खन्ना आदि विद्यार्थी सहभागी झाले होते.