कुंभजाई एज्युकेशन सोसायटी संचलित सोनाळी अभिनव इंग्लिश मेडीयमच्या संस्थापिका स्मिता रवींद्र तावडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

वैभववाडी : कुंभजाई एज्युकेशन सोसायटी संचलित सोनाळी अभिनव इंग्लिश मेडीयमच्या संस्थापिका स्मिता रवींद्र तावडे वय 55 यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सोनाळी अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल चे छत्र हरपले आहे. त्यांच्या निधनानंतर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कै. स्मिता तावडे यांचे मुळगाव कुंभवडे हे आहे. पती कै. रवींद्र तावडे यांच्या निधनानंतर गेली नऊ वर्ष सोनाळी, तरेळे व फोंडाघाट येथील इंग्लिश मीडियमची संपूर्ण जबाबदारी त्या सांभाळत होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांना मुंबई वसई येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुली, जावई, व नातवंडे असा परिवार आहे.