
मुंबई: सध्या Paytm या ऑनलाईन डिजिटल पेमेंट गेटवे संबधित एसएमएस ग्राहकांना येत आहे. यामध्ये तुमचा Paytm KYC लवकरच समाप्त होणार आहे तुमचं अकाऊंट चोवीस तासात ब्लॉक करण्यात येणार असून त्वरीत दर्शविलेल्या ग्राहक सेवक नंबरवर संपर्क साधावा.

अशा प्रकारचा संदेश सध्या Paytm या डिजिटल पेमेंट गेटवे सेवा देणाऱ्या ग्राहक धारकांना येत आहे. सदर मेसेज हा Paytm कडून नसून तो हॅकर्स कडून येत आहे. तुम्ही जर का या संदेशाला प्रतिसाद दिलात तर कदाचित तुमच्या माहितीची चोरी होवू शकते तसेच Paytm अकाऊंट मधील रक्कमही चोरी होवू शकते. तरी नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की अशा फसव्या मेसेजना बळी पडू नका. Paytm कडून याबाबत अधिकृतपणे महिती देण्यात आली नसली तरी ठाणे शहर पोलिसांकडून याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.






