
मुंबई : आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात एका 85 वर्षीय डॉक्टरांचा संशयित कोरोना आजाराने मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. शहरातील हिंदुजा रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरू होती. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
आज मुंबईत एका 85 वर्षीय डॉक्टरचा संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या कोरोनाचे निदान खासगी प्रयोगशाळेत झाल्याने त्यासंदर्भात अद्याप अधिकॉत माहिती मिळालेली नाही.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात एकाच दिवसात 12 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज कोल्हापुरात दोन नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले. राज्यात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. यात मुंबईतील लोकसंख्या दोन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन जर चुकून झालं तर खूप गंभीर परिस्थिती निर्माण होईल.
आज मुंबईत सर्वाधिक 51 कोरोना रुग्णांची संख्या आहे. दरम्यान, देशातही हा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. आज घडीला देशात 863 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 17 जणांचा यात बळी गेलाय.
दिलायसादायक बाब म्हणजे यातील 73 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १५३ वर पोहोचली आहे. मुंबई नव्याने पाच रुग्ण आढळलेत. तर सांगलीत १२ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवार संध्याकाळपर्यंत रुग्णांची संख्या ही १२५ होती. आज सांगलीत सकाळपासून १२ रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. त्यामुळे सांगलीतल्या कोरोना रुग्णांची संख्या २३ झाली आहे. तर नागपूरमध्ये आज नवीन ५ रूग्ण आढळले,यात २ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. तर मुंबईत पाच नवे रुग्ण वाढलेत. त्यामुळे आता राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या १५३ वर गेली आहे.
रुग्णांमध्ये नवी मुंबईतील अवघ्या दीड वर्षांच्या बाळाचा समावेश आहे. या बाळाच्या इतर तीन कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. या चौघांवर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.यापूर्वी कल्याणमधील तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.






