घाऊक आणि किरकोळ भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांना कल्याण पूर्वतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण व विठ्ठलवाडी स्थानकासमोरील पटांगणावर भाजी विक्रीला महापालिकेची अधिकृत मान्यता !

कल्याण – कोरोंना साथीच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण करणे गरजेचे आहे,याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने कल्याण(प) येथील लक्ष्मी मार्केट हे स्थलांतरित केले आहे.

लक्ष्मी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांच्या वाहनांचे नियोजन फडके मैदान, आधारवाडी, कल्याण (प), वायले नगर, पोतदार शाळेसमोरील मैदान, कल्याण (प), यशवंतराव चव्हाण क्रीडांगण ( मॅक्सी ग्राउंड),कल्याण (प) येथे करण्यात आले आहे.

कल्याण (पूर्व) येथील ग्राहकांना देखील भाजीपाला मिळणे सोयीचे व्हावे म्हणून लक्ष्मी मार्केट मधील व इतर घाऊक व किरकोळ व्यापारी यांना कल्याण (पूर्व) येथे दादासाहेब गायकवाड क्रीडांगण व विठ्ठलवाडी स्थानकासमोरील जून्या जकात नाक्यालगतच्या जागेवर भाजीपाला विक्री करणेबाबत निर्देशित करण्यात येत आहे.