
खारघर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी आदेश लागू असून सुद्धा विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एकूण ४६ जणांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाय मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एकूण ४६ जणांना सकाळी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी, काही नागरिक रस्त्यावर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारघर पोलिसांकडून अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाय मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एकूण ४६ जणांना सकाळी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कोणीही घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून फक्त एकदा व एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, सर्व ठिकाणी मास्क वापरावा व सोशल डिस्टन्सींग ठेवावे, असे आवाहन खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.






