Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत वाहनचालक पदासाठी भरती

स्पीड पोस्ट किंवा ई मेल द्वारे अर्ज करण्याची गरज

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात परिवहन विभगाच्या आस्थापनेवरील वाहन चालक पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून स्पीड पोस्ट किंवा ईमेल द्वारे अर्ज मागिण्यात येणार आहेत. विविध प्रवर्ग निहाय सामाजिक आणि समांतर आरक्षण धरून एकूण 65 पदे भरण्यात येणार आहेत. सर्वसाधारण गट, महिला आरक्षण, माजी सैनिक , प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू यांच्या आरक्षण सहित एकूण 65 पदे भरण्यात येणार आहेत. यासंबंधीमाहिती व जाहिरात महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा तसेच त्याच्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने (RTO) देण्यात येणारा जड/हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. सदर परवाना हा किमान दोन वर्षांपूर्वीचा वैध असावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज स्पीड पोस्टने पाठविण्याचा पत्ता खालील प्रमाणे

कार्यकारी अभियंता (परिवहन) शहर यांचे कार्यालय, वरळी यानगृह इमारत, पहिला मजल, ई मोझेस मार्ग, वरळी, मुंबई, पिन कोड – 400018.

अर्ज पाठविण्याचा ई मेल आय डी

mcgm.driver@mcgm.gov.in

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 28.04.2020 संध्याकाळी 5.30 पर्यंत.

संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी खालील PDF file वाच वाचा किंवा डाऊन लोड करा