
महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त अजय मेहता यांची उपस्थिती
मुख्यमंत्र्यांची राज्यपाल भेट
आज महाराष्ट्र दिन निमित्ताने मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करत ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून उद्धव साहेब ठाकरे यांनी अभिवादन केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व आयुक्त अजय मेहता सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्य आंदोलनातील हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाचे यंदा हीरक महोत्सवी वर्ष असून कोरोना संकटाचे सावट या उत्सवावर पाहायला मिळाले. सोशल डिशटंस चे भान पाळून अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिन ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम पार पडला.

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थेट राजभवनावर गेले. मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित असल्याचे कळते. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याकरिता ही भेट असल्याचे सांगण्यात येते असले तरी उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्य पेचावर चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्धव यांची राज्यपाल यांच्याशी जवळपास 20 मिनिटे चर्चा केली.







