
मुंबई: कोरोनाने हाहाकार माजविला असताना आता टाटा मेमोरियल हॉस्पिटलने खास करून कोव्हिड19 प्रोजेक्टसाठी विविध वैद्यकीय सेवा क्षेत्रात हंगामी तत्वावर भरती जाहीर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मेडिकल ऑफिसर, सोशल वर्कर, फर्मासिसिष्ट, क्लेरिकल स्टाफ, रेडिओ लॉजी टेक्निशियन, फ्लेबोटोमिष्ट, आय टी टेक्निशियन, इलेक्ट्रेशीयन, आय सी यू टेक्निशियन, नर्सेस या विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
याशिवाय चतुर्थ श्रेणी पद वॉर्ड बॉय, आया, स्वीपर, आणि अटेंडट इत्यादी विविध पदांसाठी सुद्धा भरती करण्यात येणार आहे.
सदर भरती प्रक्रिया परेल येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये थेट मुलाखतीद्वारे होणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 26 मे 2020 पासून दिनांक 5 जून 2020 पर्यंत बायोडेटा व शैक्षणिक कागदपत्रांसह ठरविलेल्या तारखेप्रमाणे उपस्थित राहावे. याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.







