विद्यापीठांच्या विविध शाखांचे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत राज ठाकरे यांचे राज्यपाल कोश्यारी यांना पत्र

मुंबई: सध्या राज्यात विविध विद्यापीठांच्या अंतिम सत्रातील परीक्षा प्रलंबित आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यात लागू असलेली टाळेबंदी यामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षातील परीक्षेबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यासर्व बाबींमुळे विद्यार्थी कमालीचा दाडपणात आहे. दरम्यान राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षाना याबाबत पत्र ही पाठविले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विद्यार्थी वर्गाचा विचार करून सर्व विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सर्व विद्यापीठातील विविध शाखेचे अंतिम सत्रातील सर्व परीक्षा रद्द करण्याची विनंती एका पत्राद्वारे केली आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील सत्रचा विचार करून किंवा इतर पर्याय अनुसरून उत्तीर्ण करावे v पुढील शिक्षणासाठी मोकळे करावे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.