
सेंट्रल रेल्वेच्या भायखळा डिव्हिजनमध्ये सिनीयर रेसिडेंट पदावर भरती सुरू आहे. वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने उमेदवारांना थेट भरतीसाठी मुलाखत द्यायची आहे. इच्छुक उमेदवार ६ जानेवारी २०२१ रोजी थेट वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्शित राहू शकतात.
Central Railway Recruitment 2021: रिक्त पदांबाबतची अधिक माहिती
- ईएनटी ENT – १ पद
- जनरल सर्जरी – १ पद
- गायनॅकोलॉजिस्ट अँड ऑब्सटेट्रिशियन – १ पद
- ऑप्थल्मोलॉजी – १ पद
- जनरल मेडिसिन – १ पद
अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / पदव्युत्तर पदवीधारक असावेत. एमडी / डीएनबी / एमएस / डीएनबी किंवा डिप्लोमा किंवा डिग्री असावी.
मध्य रेल्वे भरती २०२१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ४० वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत मिळेल.
इच्छुक उमेदवारांनी ६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्रांसह डॉ. बी.ए.एम हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर कार्यालय, सेंट्रल रेल्वे, भायखळा (पूर्व) – मुंबई २७ येथे होणाऱ्या वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हावे.






