
अभिनेता आणि बॉलिवूड चित्रपट निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan), सोहेल खानसह (Sohail Khan) त्याचा मुलगा निर्वाण खानविरुद्ध (Nirvaan Khan) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीएमसीच्या (BMC) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेकडून त्यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
नव्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार ब्रिटन आणि यूएईवरून आलेल्या प्रवाशांता 7 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. मात्र, हे तिघेही यूएईवरून परतल्यानंतर ताज हॉटेलमध्ये बुकींग असल्याचे सांगून ते परस्पर घरी निघून गेले होते.
25 तारखेला हे तिघे यूएईवरुन मुंबई आले होते. त्यावेळी त्यांचे बुकींग ताज हॉटेलमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला महापालिकेने आढावा घेतला. त्यावेळी हे तिघेही हॉटेलमध्ये गेलेच नाहीत.
तसेच ते घरी निघून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआय वृत्त संस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे






