
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) विरोधात चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) फिरकीपटू शाहबाझ अहमदच्या (Shahbaz Ahmed) फिरकीच्या जोरावर 6 धावांनीं रोमहर्षक विजय मिळवला.
निर्णायक क्षणी शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. आरसीबीच्या (RCB) आजच्या सामन्यातील विजयामुळे हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरचे (David Warner) झुंजार अर्धशतक व्यर्थ गेले. कर्णधार वॉर्नरने पुढाकार घेत संघाचे नेतृत्व करत 54 धावा केल्या. वॉर्नर आणि मनीष पांडेने 83 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले होते मात्र मधल्या फळीतील अपयशामुळे संघाच्या हातून सामना निसटला.
वॉर्नर वगळता पांडेने 38 तर जॉनी बेयरस्टोने 12 धावा केल्या. अन्य फलंदाज एकेरी धावसंख्याच करू शकले. विशेष म्हणजे हैदराबादचा चेपॉक स्टेडियमवरील हा सलग पाचवा पराभव ठरला. शाहबाज अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या मोहम्मद सिराजला 2 तर काईल जेमीसन आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळली.











