
नवी दिल्ली: शिवसेनेला मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कमी मंत्रीपदे मिळाली असली, तरी भाजपकडून शिवसेनेला राज्यपालपद देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शिवसेनेने मिझोरामच्या राज्यपालपदासाठी लिलाधर डाके यांचे नाव निश्चित केले आहे.
मोदींच्या यावेळेसच्या मंत्रीमंडळात मित्रपक्षांना अनेक मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर खास करून शिवसेनेच्या काही खासदारांना राज्यपाल पद देखील मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी वर्णी लागल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.






