
अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्यातर्फे पनवेलमध्ये राज्यस्तरीय मायबोली एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रांत राहणाऱ्या मर्यादित अंतरभारती एकपात्री अभिनय स्पर्धा शनिवारी, १० ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये होणार आहे.
मराठी भाषेत अभिनय करण्यासाठी राज्यस्तरीय मायबोली एकपात्री व द्विपात्री स्पर्धा तसेच अंतरभारती एकपात्री स्पर्धा इतर भाषांकरिता असणार आहे. स्पर्धेत १६ वर्षे वयाच्या पुढील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २ हजार, द्वितीय क्रमांकास १५०० आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या स्पर्धकास १ हजार रुपये असे बक्षिसाचे स्वरूप असेल. या शिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे दोन स्पर्धकांना दिली जाणार आहेत. द्विपात्री स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ३ हजार, द्वितीय क्रमांकास २ हजार, तर तृतीय क्रमांकास २ हजार आणि उतेजनार्थ २ पारितोषिके दिली जाणार आहेत. आंतरभारती एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांकास ५ हजार, द्वितीय क्रमांकास ३ हजार, तर तृतीय क्रमांकास २ हजार रुपये, उतेजनार्थ एकूण २ पारितोषिके तसेच तिन्ही गटांतील विजेत्यांना चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑडिशनचे व्हिडीओ ७७५७०००००० या क्रमांकावर किंवा mailto:natyaparishad.panvel@gmail.com, natyaparishad.panvel@gmail.com यावर पाठविता येणार आहे. स्पर्धेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी गणेश जगताप ९८७०११६९६४ यांच्याशी संपर्क साधावा.






