
मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल देशमुख यांचे शेतकऱ्यांना आव्हान.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी 25 ते 50 हजार मदत शेतकऱ्यांना करणार हे आश्वासन मुख्यमंत्री कधी पूर्ण करणार ? :- ॲड.सुनिल देशमुख
१) शेतकऱ्यांना घोषित केल्याप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत तात्काळ घोषित करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
२) शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करावे.
३) पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम थेट खात्यात मिळावी.
४) कोरोना काळातील वीजबिले माफ करावी व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे तात्काळ बंद करावे.
५) शेतकऱ्यांना बाजारसमिती मध्ये मतदानाचा अधिकार परत द्यावा.
६) कृषी पंपांना दिवसा किमान १० तास अखंड वीज पुरवठा करावा.
७) नादुरुस्त ट्रान्स्फार्मर ची दुरुस्ती तात्काळ २ दिवसात व्हावी.
८) कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा.
या व इतर मागण्यासाठी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ०१:०० वाजता बुलडाणा येथील जिजामाता ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आक्रोष मोर्चाचे आयोजन भारतीय जनता पार्टी च्या वतीनं करण्यात आलेले असून आज त्यांच्या नियोजना संधर्बात बुलडाणा तालुक्यातील गावानं मध्ये नियोजन बैठका घेण्यात आल्या यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल हासनराव देशमुख यांनी बोलताना सांगितले कि हे भेसळ वसुली सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना आज पर्यंत पाच पैशाची सुद्धा मदत या सरकारच्या वतीने करण्यात आली नाही. मुख्यमंत्री होण्या अगोदर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत केलेली घोषणा अद्याप देखील मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलेली नसून. कोरोना काळातील वीजबिल देखील सक्तीने शेतकऱ्यांकडून वसुली सरकार वसूल करत आहे. एकीकडे कोरोना मुळे तरुणांचे रोजगार मोठ्या प्रमाणात गेलेले असताना आरोग्य विभागातील नोकरी मध्ये देखील या सरकारने घोळ करून ग्रामीण भागातील तरुणांना नौकरीपासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे.

राज्यात महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना सरकार मधील मंत्री देखील महिला अत्याचाराच्या प्रकरणात सापडलेले आहे. या उलट केंद्र सरकारच्या योजना सर्व सामान्य पर्यंत पोहच असून त्याचा लाभ सर्व सामान्य जनतेला होताना दिसत आहे. PM किसान योजना, मोफत रेशन असो किव्हा घरकुल व स्वच्छता ग्रहासाठी १२०० हजार अनुदान या चा लाभ सर्व स्थरातील नागरिकांना होताना दिसत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या जुलमी सरकारला जागे करण्यासाठी व आपल्या शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आसूड मोर्च्यात सामील व्हावे अशे आव्हान बुलडाणा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांना करतो.






