https://youtu.be/ECXJoqSvIys
मुंबई: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३१ वर गेलीय. राज्यातल्या ९ शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. यात सर्वात जास्त रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झालीय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची...
मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण...
अलिबाग: मांडवा पो.स्टे. हद्दीत आज दि.14/03/2020 रोजी सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजिंठा प्रवासी बोट 88 प्रवाशी घेऊन मांडवा जेट्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर असताना अचानक बुडू लागल्याने बोटीवरील प्रवास करणारे पुरुष, महिला व लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड चालू केला असता सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड...
मुंबई : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी याबाबतची घोषणा केली आहे. चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या ७ देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी ५:३० नंतर देशात विमानाने येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.  मुंबई, नवी मुंबई,...
नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत कोरोनामुळे वृद्ध महिलेचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या महिलेला कफ झाला होता. याआधी तिला मधुमेह होता. तिचा मुलगा इटलीहून परत आला होता. त्याच्यामुळे तिला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना की मधुमेहामुळे तिचा मृत्यू झाला ? हे अजून स्पष्ट झाले नाही. याआधी काल कर्नाटकच्या कलबुर्गी...
मुंबई : कोरोनामुळं महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती देणारं बनावट पत्रक सध्या व्हायरल होतंय. मात्र त्या पत्रकावर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण तसं कोणतही पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नावानं हे पत्रक व्हायरल केलं जातं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा गैरफायदा घेत कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. मात्र या पत्रकावर आणि अशा अफवांवर विश्वास...
पुणे- पुण्यात एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची  घटना समोर आली आहे.  दरम्यान खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत.अटक केलेल्या आरोपींमध्ये फिर्यादीचा बॉडीगार्ड, घरकामगार व सामाजिक कार्यकर्ता अशा तिघांचा समावेश आहे.  आशिष पवार...
मुंबई: शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ३४०० अंकांनी कोसळला. निफ्टीत ९०० अकांहून अधिक घसरण झाली होती. त्यामुळे शेअर बाजाराचे ट्रेडिंग ४५ मिनिटांसाठी रोखण्यात आले. यात गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, बाजार ४५ मिनिटांनंतर पुन्हा सुरु झाला आणि निर्देशांक सावरले. आजचा दिवस बाजारासाठी 'ब्लॅक फ्रायडे' ठरला भारतात करोना विषाणूचा पहिला बळी गेल्याने जागतिक...
मुंबई : राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला आहे. दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, शिवाजी आढाळराव पाटील यांची नावं चर्चेत असतानाच शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींसारख्या उमद्या आणि युवा नेत्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे. तर चंद्रकांत खैरे यांनी देखील या विषयी खदखद व्यक्त केली आहे. खैरे म्हणाले, माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. आदित्य साहेबांना आवडलं नाही. मी माझं काम करत...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या