नवी दिल्ली: शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससह राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर चर्चा देखील सुरू झाली आहे. दुसरीकडे, मोदी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांनीही गेल्या सोमवारी पदाचा राजीनामा दिला आहे. 'अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत....
नवी दिल्ली: देशात वीस शहरातील पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. या चाचण्यांमध्ये मुंबईचं पाणी शुद्धतेच्या बाबतेत अव्वल ठरलं आहे. द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड च्या अहवालानुसार देशातील वीस शहरातील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यातपासणीत मुंबईचे पाणी सर्वात शुद्ध पाणी म्हणून अव्वल ठरलं आहे. पाण्याच्या शुद्धतेच्या बाबतीत मुंबई नंबर एक, तर हैदराबाद नंबर दोन आणि भुवनेश्वर नंबर तीन...
इंदोर: इंदूर येथील होळकर मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाहुण्या बांगलादेश संघानं भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर पहिल्याच दिवशी शस्त्रे खाली ठेवली. अवघ्या १५० धावांतच बांगलादेशचा संघ गारद झाला. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांच्या तिकडीने मिळून बांगलादेशचे सात फलंदाज टिपले. त्यांना साथ मिळाली ती आर. अश्विनची. त्याने...
मुंबई: राज्यात भाजपसोबत शिवसेनेने फारकत घेतली आहे. केंद्रातल्या एकमेव मंत्रिपदाचाही शिवसेनेकडून राजीनामा देण्यात आला आहे. पण एनडीएतून बाहेर पडण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यामुळे भाजप आणि शिवसेना यांची ३० वर्षांची युती संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
राजधानी दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एनडीएतील...
Indore: Mayank Agarwal on Friday struck his second double century in four Tests as India took their first innings lead over Bangladesh to more than 200 on day two of the opening Test. The in-form opener, who has hit three tons and two double hundreds in his last five Test innings, pulverised the Bangladesh bowling. He completed...
Indore: On one of the bounciest tracks in recent times, Bangladesh were bundled out for 150 in 58.3 overs, lasting barely two sessions and a few overs more on Thursday.
Mayank Agarwal and Cheteshwar Pujara remained unbeaten on 37 and 43 respectively at stumps on Day 1 .
नवी दिल्ली: आज प्रथमच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय भाष्य केले. 'शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी आम्हाला स्वीकारार्ह नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावे,' असे आव्हान दिले.
त्यांनी सांगितले, 'जर आमच्या महायुतीला निवडणुकीत यश मिळालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असं मोदींनी सार्वजनिक व्यासपीठावर अनेक वेळा सांगितलं. त्याचवेळी शिवसेनेने विरोध...
मुंबई: राज्यातील अनेक महापालिकांमधील महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला होता. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने सोडतीला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. त्याची मुदत २२ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, पनवेल, अकोला, चंद्रपूर, भिवंडी आणि जळगाव महापालिकेचं महापौरपद खुल्याप्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.
मुंबई: भाजपनंतर शिवसेनाही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नव्हती. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस पाचारण केलं होतं. पण राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्याने राज्यपालांनी केंद्राकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शिफारशीची फाइल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविले. कोविंद यांनी संध्याकाळी साडेपाच...
चालू घडामोडी
काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी तयार; उद्धव ठाकरे यांच्याशी तिन्हीही पक्षाचा संपर्क, सस्पेन्स कायम . . .
मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापन होण्यासाठी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरविण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तिन्ही पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी सत्तेत सहभागी व्हावे असा प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेना...










