मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच विराट कोहलीने पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियात सारं काही अलबेल असल्याचं सांगितलं. रोहित आणि माझ्यात बेबनाव असल्याच्या बातम्या कुठून आल्या हे माहीत नसल्याचंही त्यांनं स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत विराटला रोहितबरोबरच्या बेबनावाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी सुद्धा मीडियातूनच या गोष्टी ऐकल्या आहेत. मात्र टीम इंडियातील वातावरण अत्यंत चांगलं आणि खेळीमेळीचं...
चालू घडामोडी
भाजपाचं इनकमिंग जोमात – काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोमात; गणेश नाईक, कालिदास कोलंबकर, वैभव पिचड करणार भाजपात प्रवेश
मुंबई:
कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही आज राजीनामा दिला. कोळंबकर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. वेळोवेळी त्यांनी त्याबद्दल जाहीर वाच्यताही केली होती. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचारही केला होता. त्यामुळे कोळंबकर शिवसेनेत जाणार असल्याचा कयास वर्तवण्यात येत होता. मात्र, दोन...
नवी मुंबई: आज दुपारी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ५२ नगरसेवकांची बैठक बोलावली असून या बैठकीत भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नगरसेवकांचा तसा दबाव गणेश नाईक यांच्यावर वाढत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. असे झाल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे.
New Delhi: The government recommended several amendments to the Companies Act, including penalty on companies that do not meet the mandated 2% spending requirement towards corporate social responsibility (CSR) and “fit and proper” criteria for debarring directors from holding board positions.
The government on Wednesday recommended several amendments to the Companies Act, including penalty...
मुंबई: रेल्वे स्थानकालगतच्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवीन जागांसाठी पाहणी केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने एकूण ६० ठिकाणी पार्किंगसाठी परवानगी दिली. यानुसार ४७ ठिकाणी 'पे अँड पार्किंग'ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. उर्वरित १३ जागांवर पार्किंगसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच पार्किंगची जागा सर्वसामान्य वाहनचालकांसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
सिंधुदुर्ग: पर्यावरण संरक्षण करण्यासाठी एक प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी जबाबदारीची जाणीव करून देता यावी या भावनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभवडे या गावी एक झाड एक विद्यार्थी ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात आली. तरुण मुंबईकरांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने विद्या मंदिर कुंभवडे नं 1 याशाळेतील मुलांना वृक्ष वाटप करण्यात आले होते.
वृक्ष संवर्धन करून पर्यावरण संरक्षण...
मुंबई : आज मध्य रेल्वेवरील कल्याण-ठाणे जलद मार्गासह हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली होती. हे ब्लॉक रद्द करण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज प्रवास करता येणार आहे. तसेच हार्बरवरील प्रवाशांना पनवेलहून थेट छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाकडे जाता येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर भाइंदर आणि वसई...
‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या अहवालानुसार 2019च्या दुसऱ्या तिमाहीत शाओमीचा देशातील स्मार्टफोन बाजारात हिस्सा 28 टक्क्यांवर आला आहे. उलट गेल्या वर्षी कंपनीचा बाजारहिस्सा 31 टक्के होता. तरीही ते अव्वल क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच पदार्पण केलेल्या Realme कंपनीने देखील लक्षणीय आगेकूच केल्याचं पाहायला मिळत आहे. या कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील हिस्सा 9 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी Realme चा बाजारातील...
जपान: जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा खेळाडू बीसाई प्रणितने उपांत्य फेरीत प्रवेश केला. रिओ ऑलिम्पिक रौप्यविजेत्या व पाचव्या मानांकित सिंधूला पुन्हा एकदा अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय, पुरुष दुहेरीतही सात्विकराज-चिराग जोडीचे आव्हान संपुष्टात आले. आता, या स्पर्धेत केवळ प्रणीतवरच भारताची मदार असणार आहे.
पुरुष गटात मात्र बीसाई प्रणितने विजयी घोडदौड कायम ठेवताना...
कोलंबो ः एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला शुक्रवारी श्रीलंकेने विजयी निरोप दिला. कुशल परेराच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशाचा 91 धावांनी पराभव केला.
कुशल परेराच्या (111) शतकी खेळीला कौशल मेंडिस (43) आणि एंजेलो मॅथ्यूज (48) यांची साथ मिळाल्यामुळे श्रीलंकेने 50 षटकांत 8 बाद 314 धावा केल्या. आव्हानाचा...










