मुंबईः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या केएल राहुल याला डच्चू देण्यात आला असून, रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे.
राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. यासह मयंक अग्रवाल, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह,...
सांगली: पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांचा घरी जाऊन आरोग्य तपासणी. ट्रम्प कार्ड प्रोडकशन (माझ्या नवऱ्याची बायको) युनिटचे कलाकार आणि सामाजिक संस्थाचे स्वयंकसेवक यांच्या मार्फत घराघरात जाऊन जीवनावश्यक वस्तू तसेच पुराग्रस्ताची तज्ञ डॉक्टर मार्फत आरोग्य तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली. प्रगती फौंडेशनच्या डॉक्टर पॅनेलनेही यावेळी आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे होती....
जिनिव्हा: काश्मीरप्रकरणी जगभरातून पाठिंबा मिळविण्यात आलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानेही दणका दिला आहे. भारत आणि पाकिस्तानने हा विषय चर्चेने सोडविण्याचा सल्ला देत संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे भारताने विनंती केली तरच या प्रश्नात मध्यस्थी करणार असल्याचं संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
दोन्ही देशांनी काश्मीरचा मुद्दा शांततेत...
चालू घडामोडी
मेगा भरती भाग तीन: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कोसळली; गणेश नाईक यांचा 48 नागरसेवकांसह मुख्यमंत्रयांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
माजी खासदार संजीव नाईक हे सुध्दा भाजपवासी
नवी मुंबई: नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजय नाईक यांच्यासह ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
ठाणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री गणेश नाईक यांनी आज पुत्र माजी खासदार संजीव नाईक आणि 48 नागरसेवकांसह...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (१० वी) निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थाळावर हा निकाल ऑनलाइन जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून या निकालाची प्रत (प्रिंटआऊट) घेता येणार आहे. हा निकाल शिक्षण मंडळाच्या नऊही विभागीय...
मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षचे नेते नारायण राणेयांना अखेर भाजपप्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे १ सप्टेंबर रोजी राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपप्रवेशाच्या या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे.बेस्ट संयुक्त कृती समितीने सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून वडाळा डेपो येथे बेमुदत उपोषण पुकारले आहे. यावेळी कामगार नेते शशांक राव यांची...
इस्लामाबाद: भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने गझनवी बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करत भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील कराचीजवळ सोनमियानी प्रक्षेपण चाचणी केंद्रावरून गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून समर्थन न मिळाल्याने पाकिस्तानने यापूर्वीच बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची धमकी दिली होती.
मुंबई : अवधूत तटकरे यांनी आज दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली. ते आजच शिवबंधन बांधून घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांचा शिवसेना प्रवेश झाला नाही. तटकरे व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी रायगडमधील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली.अवधूत यांनी स्वत: या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली. 'उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली. राजकारणाच्या मुख्य...
मुंबई: बेस्ट कामगारांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेस्ट प्रशासनाशी वाटाघाटी करूनही तोडगा न निघाल्याने कामगारांनी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बेस्ट कामगारांनी वडाळा बस डेपोमध्ये उपोषण सुरू केलं आहे. स्वत: शशांक रावही या उपोषणात सहभागी झाले असून उपोषण सुरू असताना आज त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २० मध्ये...
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर आता काश्मीरमधील तरुणांसाठी मेगा नोकरभरती सुरू करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी खात्यातील ५० हजार जागा रिक्त असून या जागा लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आहे. काश्मिरी तरुणांनी या नोकरभरतीचा लाभ उठवण्याचं आवाहनही मलिक यांनी केलं आहे.
येत्या सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामं करण्यात येणार आहेत. त्यासाठी...











