नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने ईएमआय घटणार आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय पत धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला. ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे. आता यामुळे कर्ज फेडणाऱ्यासाठी कमी हफ्ता बसणार आहे आणि कर्ज स्वस्त होणार आहे.
07-Aug-2019दैनिक राशिभविष्य मेष दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. वृषभ आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग...
गयाना: तिसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी केली. वेस्ट इंडिजने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ३ धावांवर झेलबाद झाला. ओशाने थॉमस याने धवनला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्माच्या जागी संघात स्थान दिलेल्या लोकेश राहुलला फारशी...
नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या प्रभावशाली नेत्या सुषमा स्वराज यांचं आज वयाच्या67व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच अनेक नेत्यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. सुषमा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने...
कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरात सगळीकडे पानीच पानी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पातळी ५० फूट ९ इंच इतकी पोहोचली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असून पाणी उपसा केंद्रातही पाणी शिरल्याने कोल्हापूर शहर आणि उपनगरांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.
नवी दिल्ली: आज सकाळी ११ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलमातील तरतूदी रद्द करण्याच्या प्रस्तावाबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचं आणि जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचं विधेयक लोकसभेत मांडलं. त्यावर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अमित शहा यांनी उत्तरं दिली. त्यानंतर सायंकाळी सव्वा सात वाजता या विधेयकांवर मतदान घेण्यात आलं. यावेळी जम्मू-काश्मीरमधील...
उरलेल्या पिठापासून शंकरपाळे साहित्य: • पट्टी सामोस्याच्या उरलेल्या पट्ट्या • लाल तिखट • मीठ • चाट मसाला • तळण्यासाठी तेल कृती: हि पट्टी सामोसेची कृती. पट्टी सामोसे बनवल्यावर उरलेल्या पट्ट्यांचे तिखटमिठाचे शंकरपाळे करता येतात. असे तिखटमिठाचे शंकरपाळे कधीही खायला बनवता येतात. तर उरलेल्या पट्ट्यांपासून शंकरपाळे बनवण्याची हि कृती. • पटट्याचे शंकरपाळ्यासारखे चौकोनी तुकडे करावे. व...
06-Aug-2019दैनिक राशिभविष्य मेषनोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. वृषभलेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील....
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या टीम ने आज मास्टर स्ट्रोक खेळत कलम 370 हटवण्याचं जाहीर केले. भारताच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय असून सरकारच्या या निर्णयाचं विविध ठिकाणी स्वागत होत आहे. या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयामुळे जम्मू काश्मीर चा विशेष राज्य दर्जा संपुष्टात येणार आहे. 72 वर्षांनंतर वादग्रस्त कलम...
जम्मू काश्मीर: काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं असून प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना सोमवारपासून...

सर्वाधिक प्रसिद्ध बातम्या