फ्रान्स, जर्मनी, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकली, पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणीची घोषणा, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट, भारत सरकार सतर्क, राज्यांना महत्त्वाचे आदेश

यूरोप, अमेरीकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धूमाकुळ, पुन्हा लॉकडाऊनकडे जग

लस घेतल्यामुळे कोरोनापासून आपण सुरक्षित झालोत असं वाटत असेल तर यूरोप तसच आफ्रिकन देशात जो कोरोनाचा उद्रेक झालाय तो आपला समज खोटा ठरवणारा आहे. कारण फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, पोर्तूगाल, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकलीय. याच उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी आणीबाणी जाहीर केलीय तर काहींनी शाळा, ऑफिसेस पुन्हा एकदा बंद केलीत. आफ्रिकेतल्या सहा देशातून येणाऱ्या विमानांवरही बंदी घालण्यात आलीय. B.1.1.529 असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव असून तो अधिक घातक असल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे हा नवा व्हेरिएंटनं त्या देशात धूमाकुळ घातलाय जिथं लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. म्हणजेच कोरोनाच्या व्हेरिएंटला रोखण्यात  लस अपयशी ठरतेय.

कोरोनाच्या नव्या लाटेनं फ्रान्स, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोर्तूगाल, झेक रिपब्लिक ह्या देशांना कवेत घ्यायला सुरुवात केलीय. फ्रान्समध्ये एका दिवसात 33 हजार 464 नवे रुग्ण सापडलेत. एप्रिलनंतर एवढे रुग्ण एकाच दिवसात सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिकेत 2 हजार 465 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा 321 टक्क्यांनी अधिक आहे. जर्मनीत तर कोरोनानं हाहाकार माजवलाय. तिथं एका दिवसात 75 हजार 565 नवे कोरोना रुग्ण सापडलेत. हा आतापर्यंतचा रूग्ण सापडण्याचा सर्वात मोठा आकडा आहे. अमेरीकेतही कोरोनाचा उद्रेक झालाय. 1 लाख 17 हजार, 666 एवढे नवे रुग्ण सापडलेत. दीड हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 18 दिवसांपासून हा आकडा सातत्यानं वाढतो आहे. बेल्जियममध्ये कोरोनाचे 23 हजार 350 नवे रुग्ण सापडलेत. ऑक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा रुग्ण आकडा आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण हे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं बाधित आहेत.

कोरोनाच्या नव्यानं झालेल्या स्फोटावर इंग्लंड, इस्त्रायलनं 6 आफ्रिकन देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातलीय. हे देश आहेत दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, नामिबिया, झिम्बाब्वे, लेसोथो, इस्वातिनी, मोझंबिक. नवा कोरोना व्हेरिएंट हा लसीकरणाच्या प्रोग्रामलाच धोका असल्याचं मत इंग्लंडनं व्यक्त केलंय. झेक रिपब्लिकनं आणीबाणीची घोषणा केलीय तर पोर्तुगालनं नैसर्गिक आपत्ती जाहीर केलीय. त्या पार्श्वभूमीवर नवी बंधनं घालण्यात आलीयत. त्यात मास्क पुन्हा अनिवार्य करण्यात आलाय. ख्रिसमसच्यापुर्वी टेस्टिंग सांगण्यात आलीय तर काही जागांसाठी पास अनिवार्य केला गेलाय. विशेष म्हणजे पोर्तुगाल हा जगातल्या सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांपैकी एक आहे.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना विषाणूचा नवा वेरिएंट (Corona New Variant) आढळला आहे. या नव्या वेरिएंटमुळं 100 हून अधिक लोक संक्रमित झाले आहे. कोरोनाचा नवा वेरिएंट समोर आल्यानंतर दक्षिण आफ्रिका सरकार अलर्ट झालं आहे.तिथल्या सरकारनं प्रयोगशाळांच्या सहकार्यानं नव्या वेरिएंटनं संसर्गित होणाऱ्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा वेरिएंट किती संक्रामक आणि धोकादायक आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेशन डिसीजच्या माहितीनुसार हा वेरिएंट संक्रामक असू शकतो. भारत सरकार (India Government Alert) यामुळं अलर्ट झालं आहे. भारतानं सर्व आंतररराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एनसीआडीनं नवी कोरोना वेरिएंटचं नाव B.1.1.529. असल्याचं म्हटलं आहेय दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं NGS-SA च्या सदस्य असणाऱ्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना तात्काळ जिनोम सिक्वेसिंग करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा नवा संक्रामक किती घातक आहे याची तपासणी करण्याचा हेतू या मागे आहे. भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूष यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.