मिस युनिव्हर्स 2021 विजेती Harnaaz Kaur Sandhu चे मुंबईत आगमन

मिस युनिव्हर्स 2021 विजेती हरनाज कौर संधू सौंदर्यस्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर बुधवारी भारतात परतली. मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचे आज संध्याकाळी मुंबईमध्ये आगमन झाले. विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताचा व्हिडिओ समोर आला आहे. 13 डिसेंबर रोजी, इस्रायलमधील इलात येथे आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा मिस युनिव्हर्सची 70 वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती, जिथे 21 वर्षीय हरनाज कौर संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली.  पंजाबच्या हरनाज संधूने सोमवारी 79 देशांतील स्पर्धकांना हरवून मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकला.