
सुरत : गुजरात मधील सुरत येथील सरथाना भागातील तक्षशीला इमारतीत लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाल्याचे बातमी आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या इमारतीत कोचिंग क्लास, डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. इमारतीत अनेक विध्यार्थी अडकल्याची माहिती आहे. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्टसर्किटस मुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






