मासरुळ जिल्हापरिषद सर्कल भाजपाच्या वतीने मढ येथे भव्य महिला आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत औषधी वाटप शिबीर संपन्न.

मासरूळ जिल्हा परिषद सर्कल भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री.मोहन बाभूळकर यांनी मढ येथील चक्रधर महाविद्यालय येथे आरोग्य शिबीर व मोफत औषधी वाटप शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन बुलढाणा विधानसभेचे मा.आ.विजयराज शिंदे साहेब यांनी केले तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिलभाऊ देशमुख हे होते.

या शिबिरात स्त्रियांमध्ये वाढते विविध आजार त्यावर उपाय व मोफत तपासणी करण्यात आली असून औरंगाबाद येथील कोडलिकेरी मेमोरियल हॉस्पिटल येथील प्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ञ डॉ.अमेय र. कोडलिकेरी (M.B.B.S., MS(OBGY) व डॉ.राधा रिशिकांत काटे M.B.B.S., MS(OBGY) डॉ.शिवानी विजयराज शिंदे (M.B.B.S) या तज्ञ डॉक्टरांनी शिबिरात आलेल्या महिलांची तपासणी करून योग्यते औषधी दिल्या. या आरोग्य शिबिरास सकाळी १० वाजता सुरवात झाली दुपारी १ वाजेपर्यंत मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मधील २३० महिलांनी याचा लाभ घेतला असून हे आरोग्य शिबीर सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे सुंदर अशे नियोजन हे मोहन बाभूळकर, दिगंबर राजगुरे, संजय झुंबड, विशाल सरदार, संजय सरदार, भीमराव बोर्डे, बंडू गव्हाणे आदींनी केले. तसेच या वेळी मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मधील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.