प्रगती फौंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पनवेल : प्रगती फौंडेशन मुंबई (रजि) या सामाजिक संस्थे मार्फत पनवेल येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पनवेल ग्रामीण भागातील विध्यार्थ्याचे पुराच्या पाण्यामुळे वह्या पुस्तक भिजून गेल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अनेक संकटाना सामोरे जावे लागत होते. नेमकी हीच बाब हेरून प्रगती फौंडेशन या संस्थेने हरी हर पुत्र भजन समाज मंडळाच्या सहकार्याने पनवेल येथील अंबिका सेवा संस्था यांच्या कार्यालयात अनेक गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप केले. याप्रसंगी प्रगती फौंडेशनच्या कार्यकारी संचालक सौ. सिद्धी राणे, अंबिका सेवा संस्थेच्या सौ. स्मिता गायकवाड तसेच प्राचार्य विद्या ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होत्या. याप्रसंगी सौ. सिध्दी राणे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना मार्गदर्शन केले.