
मुंबईमध्ये विविध परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने बीएमसी काम करत असते. अशात मुंबई-मीरा भाईंदर कनेक्टिव्हिटीची गरज वाढली आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन सध्याचा दहिसर लिंक रोडपासून भाईंदरपर्यंत प्रस्तावित 6 किमी लांबीचा व 45 मीटर रुंदीचा रस्ता बीएमसी बांधणार आहे. यातील 1.5 किमी मार्ग एमसीजीएममध्ये, तर 4.5 किमी मार्ग मीरा भाईंदर कॉर्पोरेशनमध्ये असेल. मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली.
हा प्रस्तावित उत्तरेकडील किनारपट्टीच्या रस्त्याचा एक भाग आहे, परंतु हा अत्यावश्यक असल्याने या रस्त्याचे बांधकाम युद्धपातळीवर होईल. दहिसर पश्चिम ते भाईंदर या कनेक्टिव्हिटीमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल तसेच दहिसर पूर्व आणि WEH वरील रहदारी आणि दबाव कमी होईल.






