
नवी मुंबई – स्विगी मध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या विविध प्रश्नांवर आज महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने स्विगी आस्थापनाची भेट घेतली व कामगारांची होत असलेली पिळवणूक थांबावी यासाठी कामगार नेत्यांनी मागणी केली. याअगोदर नवी मुंबईतील सानपाडा कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण मराठी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र दिले त्यानंतर सर्व कामगारानसोबत अंधेरी कार्यालयात धडक दिली. यावेळी स्विगी तर्फे मुंबई झोनल प्रमुख अमोल डांगे यांनी सविस्तर चर्चा करून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.
कामगारांच्या काही प्रमुख मागण्या कामगारांना देण्यात येणारा मिनिमम गॅरंटी बोनस ,भगीदाराला देण्यात येणाऱ्या ऑर्डरला कमाल किलोमीटरचे बंधन ,26 दिवस काम करणाऱ्या कामगारांना भत्ता,रात्री देण्यात येणारी रोख रकमेची ऑर्डर सुरक्षेच्या दृष्टीने देण्यात येऊ नये, कामगारांना विनाकारण ब्लॉक करण्यात येऊ नये अश्या विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

या मागण्या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित साहेब ठाकरे यांची लवकरच स्विगी आस्थापनेकडून भेट घेणार असल्याचे मनकासे अध्यक्ष संतोष धुरी यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष संतोष धुरी उपाध्यक्ष निशांत गायकवाड चिटणीस केतन नाईक,निलेश पाटील महाराष्ट्र नवनिर्माण मराठी कामगार सेना नवी मुंबई शहर संघटक अक्षय भोसले , उपशहर संघटक सुर्यकांत गोडसे, सचिव बाबासाहेब ( नाना) भुयेकर मनकासे चिटणीस रेमन कोळी, उप चिटणीस अक्षय पनवेलकर, अक्षय परवाडी, गणेश चुनेकर अंकुश जाधव विभाग अध्यक्ष रोहन सावंत, चंद्रकांत डांगे शाखा अध्यक्ष तुषार राजपूत यांच्यासह स्वीगीचे शेकडो कामगार उपस्थित होते.






