प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन.
आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रगती फाउंडेशन आणि विमल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.


शिबिरासाठी श्री हरिहर पुत्र भजन समाज, मिलेनियम हॉस्पिटल, स्वराशी नेत्रालय, फॅक्टो व्हिजन, पर्ल कोशेम प्रायव्हेट लिमिटेड, ट्रायडेंट टेक्निकल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली ब्लड बँक आणि आयटीएम यांचे सहकार्य लाभले.


नवी मुंबईतील जुईनार, शिरवणे गणेश मंदिर सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपलब्ध आरोग्य सेवेचा लाभ घेतला. शिबिराच्या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, सामान्य आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी तपासणी, आयुर्वेदिक उपचार व मार्गदर्शन यांचा समावेश होता.


प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.संजीव नाईक यांनी कोरोना साथीच्या काळात आरोग्य सेवेचे महत्त्व विश्‍लेषण करून नागरिकांनी करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व आयोजकांचे आणि सहकार्यांचे कौतुक केले. अशा शिबिराचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिरात नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी विशेष उपस्थिती लावून सर्वांना मार्गदर्शन केले. शिबिर प्रसंगी विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर व विविध नेते प्रामुख्याने तनुजा मढवी, माधुरी सुतार, निशांत भगत, बाळू जरे, श्रीधर मढवी आदी उपस्थित होते.


शिबिराचा एकूण 150 नागरिकांनी लाभ घेतला असून 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. महिला रक्तदात्यांचाही सहभाग होता.


शिबिरात मोतीबिंदू रुग्णांचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.प्रकाश ढसाळ, श्री. आकाश ढसाळ, सौ. वंदना ढसाळ, विकास ढसाळ, श्री. राकेश वाणी, अन्वर चिवेलकर, श्री. किरण राणे उपस्थित होते. ढसाळ बंधू यांचा वाढदिवस सुद्धा आजच असतो आणि त्यामुळे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन या शिबिराचे आयोजन करण्यात येते.