
२०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून, जसप्रीत बुमराहने भारतासाठी ३० कसोटी, ७२ एकदिवसीय आणि ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु त्याच्या पदार्पणाच्या दोन वर्षानंतरच, तो जवळजवळ दरवर्षी जखमी होऊ लागला आहे.
माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगसह अनेक तज्ञांचे एक मत मांडले आहे. बुमराह खूप कमी धाव घेतअसतानाही वेगवान गोलंदाजी करतो, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते.
सप्टेंबर २०२२ रोजी त्याने शेवटचा सामना खेळला आणि त्यानंतर उर्वरित वर्षभर तो मैदानाबाहेर राहिला. ऑगस्टमध्ये ब्रेक दरम्यान बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. तो आता श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करणार आहे.
यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, आशिया कप आणि एकदिवसीय वर्ल्ड कप २०२३ खेळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत बुमराहसाठी या मोठ्या स्पर्धांमध्ये तंदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे आहे.
जसप्रीत बुमराहला एनसीएने तंदुरुस्त घोषित केले आहे. त्यामुळे १० जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले आहे. बुमराह सप्टेंबर २०२२ नंतर संघात पुनरागमन करत आहे.











