
ज्येष्ठ उद्योगपती आणि बजाज समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन झालं आहे. ते 83 वर्षांचे होते.
भारतातील प्रसिद्ध बजाज कंपनीचे राहुल बजाज सर्वेसर्वा होते. बजाज कंपनीला देशातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राहुल बजाज हे एकेकाळी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पोहोचले होते. मात्र, मोदी सरकारच्या काळात त्यांनी त्यांच्या सरकारवर टीकाही केली. डिसेंबर 2019 मधील त्यांचं एक वक्तव्य त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.
राहुल बजाज म्हणाले होते, “लोक (उद्योगपती) तुम्हाला (मोदी सरकार) घाबरतात. युपीए-2 सरकार असताना आम्ही कोणावरही टीका करू शकत होतो. पण आता जर आम्ही उघडपणे टीका केली तर तुम्हाला ते आवडेल का, याची आम्हाला खात्री नाही,”
राहुल बजाज अमित शहांसमोर उघडपणे असं बोलल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.






