
सिरम इन्स्टि्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांना येणाऱ्या धमकीप्रकरणी शिवसेनेविषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या पत्रकार राहुल कंवल यांनी माफी मागितली आहे.
राहुल कंवल यांचं वक्तव्य बदनामीकारक असून याबाबत कारवाई करावी तसेच राहुल कंवल यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ‘इंडिया टुडे ग्रुप’चे संस्थापक अरुण पुरी यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर राहुल कंवल यांनी ट्विटरच्या माध्यमातून माफीनामा सादर केला आहे.
राहुल कवंल यांनी केलेल्या ट्वीटनुसार, “काल वृत्तनिवेदन करताना मी सिरम इन्स्टिट्यूटला धमकी देणार्या नेत्याच्या व्हिडिओबद्दल बोललो होतो. हा व्हिडीओ राजू शेट्टी यांनी जारी केला होता. जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते नाहीत. माझ्याकडून झालेल्या गोंधळ आणि चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे.” असं राहुल आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.






