प्रविण दरेकर यांना अटकेपासून अंतरीम संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजुर प्रवर्गातून निवडणूक लढवल्याबद्दल,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना अटकेपासून अंतरीम संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्याचे न्यायालयाची सूचना.

आतापर्यंत महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होते. आता भाजप नेते राज्यातील यंत्रणांच्या रडारवर आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी अडचणीत आले आहेत. मजूर नसताना मजूर दाखवून निवडणूक लढवली आणि सहकार विभागाची फसवणूक केली असा दावा करण्यात आला आहे. तर, उच्च न्यायालयानं प्रविण दरेकर यांचा अर्ज फेटाळला आहे. दुसरीकडे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. तर, भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महावितरण संदर्भात एका प्रकरणी त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.