जयवंत लोखंडे यांची काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या मुंबई अध्यक्ष पदी नियुक्ती

मुंबई: सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रगती फाऊंडेशन या संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य व संस्थापिकिय पदाधिकारी जयवंत लोखंडे यांची काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या मुंबई अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई विभागीय काँग्रेस समिती मार्फत श्री जयवंत लोखंडे यांची आज रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते श्री लोखंडे यांना सदर नियुक्तीचे पत्र देण्यात आले. आमदार वर्षा गायकवाड यांच्या मार्फत तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्ते यांच्या मार्फत श्री जयवंत लोखंडे यांना शुभेच्छा देण्यात आले. श्री लोखंडे हे अनेक वर्षांपासून वरळी व मुंबईतील विविध ठिकाणी अनेक संस्थेच्या वतीने युवकांसाठी कार्यरत आहेत. प्रगती फौंडेशनच्या स्थापनेपासून श्री जयवंत लोखंडे संस्थेत विविध सामाजिक तथा युवक कल्याण उपक्रमात सहभागी आहेत. संस्थेच्या वतीने श्री लोखंडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.