रिक्रियेशन क्लब ऑफ वुमन आयोजित “भव्य महिला उद्योजक बाजारपेठ “चे उद्घाटन

ट्रांन्सग्लोबल एंत्रोप्युनर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीज फाँर अँग्रीकल्चरचे संस्थापक अध्यक्ष चंन्द्रकांतदादा जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

ट्रांन्सग्लोबल एंत्रोप्युनर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीज फाँर अँग्रीकल्चरचे संस्थापक अध्यक्ष चंन्द्रकांतदादा जगताप यांच्या हस्ते रिक्रियेशन क्लब ऑफ वुमन आयोजित “भव्य महिला उद्योजक बाजारपेठ “चे उद्घाटन पुनर्वसन शाळा गोरेगाव पश्चिम येथे करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी सुशिलकुमारभाऊ जाधव शिवसेनेचे शशिंकात कामत , साने गुरूजी प्रतिष्टानच्या माधुरी पाटील , गौरी परूळेकर , कामत तसेच अनेक महिला उद्योजक , अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते

या प्रसंगी चंन्द्रकांतदादा जगताप यांनी आपल्या भाषणात ट्रान्सग्लोबल एंत्रोप्युनर चेंबर्स आँफ काँमर्स अँन्ड इंडस्ट्रीज फाँर अँग्रीकल्चरचे माध्यमातून अनेक महिला सबलीकरण आणि सक्षमिकरणाच्या माध्यमातून योजनांवर कशा प्रकारे काम करित आहेत, तसेच चेंबरच्या माध्यमातून महाराष्ट्रभर उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन तसेच त्यांना उद्योजकीय क्षेत्रातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण काम हे चेंबर करत आहे असे सांगितले.

त्यांच बरोबर c.m.g.p आणि p.m.g.p अशा सरकारी योजनांची माहिती त्यांनी दिली. त्यांनंतर त्यांनी तेथील प्रत्येक स्टाॅलला भेट देऊन प्रत्येक महिला उद्योजक आणि त्यांचे उत्पादने यांची माहिती घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केले .

सदर एक्झिबिशन चे सुंदर आयोजन RCW या संस्थेच्या जोस्त्ना वाघमारे, तसेच सविता, प्रज्ञा आणि सर्व सहकारी यानी केले.