कुंभवडे गावात एक झाड एक विद्यार्थी संकल्पना; मुंबईतील तरुण ग्रामस्थांचा पुढाकार

सिंधुदुर्ग: पर्यावरण संरक्षण करण्यासाठी एक प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी जबाबदारीची जाणीव करून देता यावी या भावनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभवडे या गावी एक झाड एक विद्यार्थी ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात आली. तरुण मुंबईकरांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने विद्या मंदिर कुंभवडे नं 1 याशाळेतील मुलांना वृक्ष वाटप करण्यात आले होते.

वृक्ष संवर्धन करून पर्यावरण संरक्षण करण्याचा संदेश विद्यार्थी व नवीन पिढीला मिळावा यासाठी ही नाविन्यपूर्ण संकल्पना गावातील मुंबईस्थित तरुणांनी राबवली.

यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थ्यांचे पालक, गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन वृक्षारोपण केलं. कुंभवडे गावाप्रमाणे इतर गावातील लोकांनीही अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होण्यास नक्कीच मदत होईल. गावातील तरुण पिढीच्या या उपक्रमाची पंचक्रोशीत चर्चा असून सर्वत्र कौतुक होत आहे.