
मुंबई : आज मध्य रेल्वेवरील कल्याण-ठाणे जलद मार्गासह हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली होती. हे ब्लॉक रद्द करण्यात आल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज प्रवास करता येणार आहे. तसेच हार्बरवरील प्रवाशांना पनवेलहून थेट छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाकडे जाता येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर भाइंदर आणि वसई रोड दरम्यान आज ठरल्याप्रमाणे ब्लॉक घेण्यात येत आहे.






